तेरा मेरा ये आशिया (लघुकथा)
तेरा मेरा ये आशिया ( लघुकथा दारावरची बेल वाजली आणि मी पेपर बाजूला करून दरवाज्याकडे नजर वळवली. स्मिताने दार उघडलं आणि शिवराम आत आला. हातात कसलीतरी पुडी. ‘अरे ये ना. काय काम काढलं सकाळी सकाळी?’ मी पेपर घडी करता करता विचारलं. शिवराम आमचा वॉचमन. सहसा रात्रपाळी करतो. सकाळी गाड्या धुतो. सकाळी मी गाडी काढली कि हा जास्वंदचं फुल घेवून हजर. ‘सायेब पेडे आनल्येत. धावीचा रिजट लागला ना काल.’ ‘अहो त्याची मुलगी दहावीला होती यंदा. काय नाव रे, संजना न रे.’ स्मिताने किचन मधूनच मला अपडेट दिला. ‘अरे वा. छान. किती मार्क मिळाले संजनाला?’ ‘८२%’ म्हणत शिवरामने पेढे द्यायला हात पुढे केला. इतक्यात स्मिताहि हात पुसत पुसत बाहेर आली. ‘अरे वा. बरीच हुशार आहे कि तुझी लेक. काय करायचं म्हणते पुढे?’ मी. ‘आता त्यातलं मला काय सुधरत नाय सायेब. त्या मायलेकी जे काय ठरवतील ते. कोलेज जवल असायला पायजे म्हनतात. दोगींना बरं पडल.’ म्हणंत शिवरामने माझ्या हातात दोन पेढे टेकवले. ‘अरे आम्हा दोघांना एक पेढा पुरे. तुला बाकी ठिकाणीही वाटायचे असतील ना. शेवटी आनंद मोठा. काय?’ ‘म्हनून तर दोन पेडे सायेब. एक संजानासाटी आणि दुसरा तिच्या ...