Posts

Showing posts from December, 2020

आबोदाना ढुंडते है (लघुकथा)

Image
आबोदाना ढुंडते है ( लघुकथा) दाराच्या उजवीकडे भिंतीवर मोठ्या अक्षरात लोगो कोरला होता -  ‘ अरिहंत इंटरप्रायजेस ’  आणि खाली ट्यागलाईन  ‘ वूय बिल्ड ड्रीम्ज ’.  सतीशने सविताकडे पाहिलं. तिने खुणेनेच त्याला आत जावूया म्हटलं. काचेचा डिझायनर दरवाजा ढकलून दोघे आत गेले. आत शिरल्या शिरल्या थंडगार वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावरून गेली. वाह! एसी ऑफिसमध्ये शिरल्यावर कसं छाssन गार गार वाटतं. समोरच्या भिंतीवर एक सुंदर निसर्गचित्र होतं. शेजारच्या कोपऱ्यावर एक सुबक गणेशमुर्ती. समोर साधारण साडेतीन फुट उंच समयी. दोन्ही बाजूने लेदरचे प्रशस्त सोफे आणि मधोमध एक   मॉडर्न   टीपॉय. सविता त्या टीपॉयकडे बघतच राहिली. अस्साच ,  अगदी अस्साच टीपॉय घ्यायला हवाय नवीन घरासाठी. “ मे आय हेल्प यु सर ?”  रीसेप्शनवरच्या तरुणीने सतीशला म्हटलं. लगेचच त्याने घर बघायला आलोय सांगितलं. तिने एक फॉर्म भरायला दिला. सतीशने फॉर्म भरेपर्यंत सविता एक एक गोष्ट निरखत होती. “ थ्यांक्यू सर. यु ह्याव रिकवायरमेंट ऑफ वन बीएचके अपार्टमेंट. आमचे एक्झिक्युटिव सध्या बिझी आहेत. तोपर्यंत संतोष तुम्हाला शो फ्...

हाथ जोड सबको सलाम कर प्यारे (लघुकथा)

Image
हाथ जोड सबको सलाम कर प्यारे जुलै २००७ चा सेकंड फ्रायडे. संध्याकाळचे ५.३० वाजता टाऊन हॉल संपला. टाळ्यांच्या गजरात चेअरमन साहेब निघून गेले. सगळे निघणार ईतक्यात आशिषने त्याला इशारा केला. हातातली डायरी घेवून रोहित आशिषकडे गेला. “यस सर?”     “मिट मी इन माय केबीन आफ्टर हाफ एन आवर”... “ओके सर.” आशिष निघून गेल्यावर रोहितने डेस्क गाठलं. एम अँड एम एडव्हरटायझिंग ह्या मल्टीन्याशनल कंपनीत क्रिएटीव्ह एक्झिक्युटिव म्हणून ६ महिन्यांपूर्वीच कामाला लागला होता तो. एमबीए केल्यानंतर ४-५ वर्षांचा अनुभव गाठीशी आल्यावर हा पहिलाच चांगला ब्रेक मिळाला होता त्याला. डेस्कवर आल्यावर मेल्स चेक करून त्याने पुढच्या आठवड्याभराच्या कामांची यादी बनवली. दर शुक्रवारी संध्याकाळचं रुटीन हो तं त्याचं. मग ड्रावर लॉक करून डायरी घेवून तो आशिषच्या केबिनकडे निघाला.     जेनी, आशिषची सेक्रेटरी, फोनवर बिझी होती. तिने खुणेनेच त्याला थांबायला सांगितलं. तिचा कॉल आटपला आणि त्याच्याकडे वळून बोलली... “ही ह्याज ओन्ली १० मिनिट्स. अँड देन हि इज लिविंग फोर अ क्लायंट मीटिंग इन टाऊन.” “ओके” म्हणून तो पुढे ...

हे जीवन सुंदर आहे (त्रिवेणी लघुकथामाला - भाग 3 अंतिम)

Image
  हे जीवन सुंदर आहे  (त्रिवेणी लघुकथामाला - भाग 3 अंतिम) ऑर्किडच्या पोर्चमध्ये होंडा सिटी वळसा घालून थांबली. व्याले पार्किंगला चावी देवून मी ब्लेझर घातला. कॅमेरा घेवून सिक्युरिटी चेकचे सोपस्कार पार पाडून आत शिरले. मोठ्ठाल्या झुम्बराखाली टेबलाभोवती ताज्या फुलांची सुंदर आरास केली होती. प्रसन्न मनाने मी लिफ्टमध्ये शिरले.     टेरेसचं बटन दाबून वर पोचले, तर लक्षात आलं कि थोडा उशीरच झालाय पोचायला. माहौल आधीच बनला होता. सॅटिन आणि सिल्कच्या डिझायनर गाऊनमध्ये संध्याकाळ सजली होती. मानेभोवती, हातावर, कमरेवर वेली बुट्ट्यांचे ट्याटूज पसरले होते. काही जणींनी याहूनही उदात्त कल्पना रंगवल्या होत्या... ड्र्या गन पासून ते अ‍ॅडम - ईव्ह पर्यंत आणि मरमेड़ पासून ते कसल्याश्या रॉकस्टारचे टॅटूज . या  टॅटू  कलाकारांच्या कलेला वाव मिळावा म्हणून शरीरावर असेल नसेल ती जागा बरी मुक्तपणे मिळते. भाग्यवंत लेकाचे! रंगीबेरंगी स्कार्फ आणि हॅण्डबॅग्ज घेवून ललना सजल्या होत्या. लालचुटुक ओठांमध्ये सिगरेट आणि दुसऱ्या हातात वाईनचं ग्लास. बाप्यांचे सुद्धा वेगवेगळे लूक...कुणी शिवाजीसारखी दाढी र...

जिंदगीssआ_रही_हु_मै (त्रिवेणी लघुकथामाला - भाग २)

Image
  # जिंदगी ss आ रही हु मै खूप वेळ करण्यासारखं काही नसलं कि मी बेचैन होतो. त्या दिवशीही असाच चुळबुळ करत होतो. वाचायला पुस्तकही नाही. मग माणसं वाचायला सुरुवात होते. लाउंज मधल्या प्रवाशांचं सामान आणि नव्या नव्या ट्रावल ब्याग्ज काय बघ, जनरेशन झेडचे डिझायनर कपडे, हनिमून कपल्सची मेहेंदी निरखून पहा, लहान मुलां ची टेड्डीसाठीची मनधरणी एन्जोय कर असं काहीतरी चालू असतं. तेवढ्यात ट्रावल ब्याग सरकवत तिने माझ्या सिटच्या कोपऱ्यावरून मला वळसा घातला. फॉर्मल बिझनेस सूट – नेवी ब्लु रंगाचा आणि मोत्यांची माळ गळ्याभवती. डाव्या हातात वर्साचीची ह्यांडब्याग आणि चांदीचं नक्षीदार ब्रेसलेट. वळणावर ट्रावल ब्याग उलटणार ईतक्यात मी ती धरली आणि बाजूच्या सीटजवळ उभी केली. सीटवर बसून ती हसली आणि थ्यांक्स म्हटलं. “हाय. मी पंकज राजमाचीकर. प्रोफेशनल फोटोग्राफर. मेनली स्टील फोटोग्राफी करतो मी. बऱ्याचश्या एड्स केल्यात आणि मौडेलिंगची कामं घेतो मी. फ्रीलान्स.” पोटेंशियल कॉर्पोरेट क्लाएंटशी बोलायला मी वेळ दवडत नाही. विथ ऑर विदाऊट इन्वाईट. कोणाकडून बिझनेस येईल सांगता येत नाही. “ मी अ‍ॅ ना देसाई. आय एम इंटू अल्...