हाथ जोड सबको सलाम कर प्यारे (लघुकथा)
हाथ जोड सबको सलाम कर प्यारे
“यस सर?”
“मिट मी इन माय केबीन आफ्टर हाफ एन आवर”...
“ओके सर.”
आशिष निघून गेल्यावर रोहितने डेस्क गाठलं. एम अँड एम एडव्हरटायझिंग
ह्या मल्टीन्याशनल कंपनीत क्रिएटीव्ह एक्झिक्युटिव म्हणून ६
महिन्यांपूर्वीच कामाला लागला होता तो. एमबीए केल्यानंतर ४-५ वर्षांचा अनुभव
गाठीशी आल्यावर हा पहिलाच चांगला ब्रेक मिळाला होता त्याला. डेस्कवर आल्यावर मेल्स
चेक करून त्याने पुढच्या आठवड्याभराच्या कामांची यादी बनवली. दर शुक्रवारी
संध्याकाळचं रुटीन होतं
त्याचं. मग ड्रावर लॉक करून डायरी घेवून तो आशिषच्या केबिनकडे निघाला.
जेनी, आशिषची सेक्रेटरी, फोनवर बिझी होती. तिने
खुणेनेच त्याला थांबायला सांगितलं. तिचा कॉल आटपला आणि त्याच्याकडे वळून बोलली...
“ही ह्याज ओन्ली १० मिनिट्स. अँड देन हि इज
लिविंग फोर अ क्लायंट मीटिंग इन टाऊन.”
“ओके” म्हणून
तो पुढे गेला. दार उघडता उघडता त्याने “मे आय कम इन सर” म्हणून परवानगी मागितली.
आशिषने मानेनेच होकार दिल्यावर तो आत शिरला. आशिष साधारण ४०-४२ चा असेल. यंग
अचिवर्स अवार्ड विनर आणि फास्ट ट्र्याक करीअर
असणारा तरुण म्यानेजर – हेड ऑफ सेल्स अँड मार्केटिंग. त्याने
स्वतःच्या हिमतीवर कंपनीच्या प्रगीतीचा आलेख ७ वर्षात १० पट वाढवला होता.
“व्हाय डोंच यु सीट डाऊन रोहित. वी नीड टू टॉक.”
सहा महिन्यात हि दुसरीच खेप होती रोहितची या
केबिनमध्ये यायची. त्याने स्वतःला सावरलं.
“सी रोहित. युअर म्यानेजर सुदीप ह्याज गीवन सम
गुड फीडब्याक अबाउट यु. तू तुझ्या कामात फार मेथोडीकल आहेस वगैरे. द्याटस गुड.
तुझं हर्बल हनी लॉंचचं ब्रोशर
सुद्धा आवडलं मला.”
“थ्यांक यु सर.” रोहितला जरा बरं वाटू लागलं.
“यु विल गो अ लॉन्ग वे. यु ह्याव द पोटेन्शिअल. जस्ट कंट्रोल योअर इमोशन्स
अ बीट.” आशिषने मुद्दयाला हात घातला.
“मला समजलं नाही सर.” रोहित चाचपडत बोलला.
“यु सी, आजच्या टाऊन हॉलमध्ये तू प्रोडक्ट लॉंच बद्दल प्रश्न विचारला होतास. यु
माईट बी टेक्नीकली राईट. बट यु नीड टू नो द सेन्सिटीव्हिटी ऑफ सर्टन थिंग्ज.
चेअरमन साहेबांना ‘व्हाय कान्ट वी लॉंच धिस प्रोडक्ट आफ्टर दिवाली’ असं
विचारलंस
तू.”
“हो सर. द टीम इज वर्किंग फॉर १४ अवर्स ईच डे फॉर धिस
लॉंच. इफ वी प्रिपोन, इट मे नॉट वर्क वेल फॉर द टीम सर. शिवाय क्लायंटला
सुद्धा न्यू इयर चा फुटफ्वाल हवाय. मग घाई कशाला?”
“लुक रोहित. आय नो व्हेअर यु आर कमिंग फ्रॉम. बट
सिनिअर म्यानेजमेंटला असं कोंडीत
पकडून तू फार पुढे जावू शकणार नाहीस. सो यापुढे जस्ट आस्क इन्टेलीजंट क्वेश्चन्स.
लाईक ‘हाव द कोम्पिटीशन विल अफेक्ट
अस.’ किंव्हा ‘व्हाट इज अवर टार्गेट सेग्मेंट फॉर द नेक्स्ट ३ ईअर्स’ वगैरे. धिस
वे यु क्यान मेक एन इम्प्याक्ट. नाहीतर ही तुझी पीपल प्याशन
तुझ्या प्रगतीमधला अडथळा बनेल.”
“थ्यांक यु सर फॉर योअर फीडब्याक.”
“द्याटस ऑल फ्रॉम मी. डोन्ट बी करेक्ट, बी पोलिटिकली
करेक्ट. सुनर यु रिअलाईज धिस, गुड फॉर यु.” चेअरला एक स्विंग देवून आशिष उठला आणि ब्लेझर घालून
लेदर ब्याग घेवून मिटींगसाठी
निघून गेला.
रोहित जागेवर आला तेव्हा सगळ्या नजरा त्याच्यावरच
खिळल्या होत्या. सुदीपने त्याला कॉफीसाठी विचारलं आणि त्याने लगेच हो म्हटलं.....
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
२०१७ चा जुलै. टाऊन
हॉल आटपून रोहित
त्याच्या केबिनमध्ये परत आला. चेअर च्या मागे ५-६ अवार्ड्स ओळीने मांडलेले –
इन्क्लुडिंग यंग अचीव्हर ऑफ २०१४
आणि सेल्स टायटन. आल्याआल्या त्याने जेनीला फोन लावला.
“प्लीज सेंड राघव इनसाईड. आय वांट टू स्पीक टू हीम बिफोर लिविंग फॉर क्लायंट मीटिंग इन टाउन.”...............
आवडल्यास जरूर शेअर करा....विशेष विनंती:
माझे लिखाण माझ्या नावासहित व फोन नंबरसहित फॉरवर्ड करण्यासाठी माझी काहीही हरकत
नाही. बाकी हृदयस्थ परमेश्वर साक्षी आहेच. धन्यवाद...

Comments
Post a Comment