Posts

Showing posts from November, 2020

मैने_तो_मुहोब्बत_की_है

Image
  # मैने _ तो _ मुहोब्बत _ की _ है पंचवीसेक वर्षांनी या भागात आलो होतो. आळेफा ट्या वर गाडी थांबवून बाबूला वाटेची खातरजमा करायला सांगितली. कोपऱ्यावरच्या मिसळवाल्याला त्याने नीट पत्ता विचारला आणि कसलीतरी पुडी विकत घेवून पुन्हा गाडी चालू केली. “सायेब, सहाच्या आत परत मागारी फिरायला सांगितलंय त्याने. नाहीतर वस्ती करा आश्रमात म्हनाला. रस्ता खराब हाय आणि येतांना रानात अडकलात तर चकवा गाठल म्हनाला.”    “ठीक आहे.” माझ्या प्रतिक्रियेच्या आधीच बाबूने गाडी डावीकडे कच्च्या रस्त्यावर वळवली होती. मग खाचखळग्यांनी भरलेल्या वाटेनं त्याची कसरत सरू झाली. अर्धवट भरलेल्या घागरीतल्या डचमळणाऱ्या पाण्याप्रमाणे माझी अवस्था. बाबुला काही बोलायलाही सोय नव्हती. गेल्या बावीस वर्षात त्याने नाव ठेवायला जागा ठेवली नव्हती. शिस्तीतलं ड्रायव्हिंग. या महागड्या गाड्या अशा आडवळणाच्या वाटेला घालायच्याच का म्हणून त्याने माझी शाळा घेतली असती. नवीन गाडी दणकट घ्यावी, म्हणून गेले वर्षभर माझ्या मागे लागलाय. कधीकधी अंजली म्हणते कि नवीन गाडी तुझ्या सोयीसाठी घेणारयस कि बाबूच्या. वाटेत एक लहानसा ओढा लागला. गाडी हलक...

रंगीला_रे

Image
  रंगीला_रे   ताज प्यारेडाईसच्या पोर्चला वळसा घालून ब्ल्याक लिमोझिन गेटसमोर थांबली. ज्यापनीज डेलीगेटचे दोन अधिकारी उतरून लॉबीच्या दिशेने गेले. लिमो निघून गेल्यावर मागोमाग त्याची स्पोर्ट्स कार थांबली. ड्रायव्हर सीट वरून उतरून त्याने व्याले पार्किंग वाल्याकडे चावी भिरकावली. त्याने चावी झेलताच त्याला काही सूचना दिल्या आणि त्याच्या हातात एक नोट सरकवली. दरबानचा स्यालूट स्वीकारून त्याने लॉबीत प्रवेश केला. उजवीकडच्या डेस्ककडे वळून त्याने त्याच्यासाठी काही पार्सल आलंय काय ते विचारलं. डेस्कवरच्या एक्झिक्युटिवने ब्रीफकेसच्या आकाराचं पार्सल त्याला दिलं. त्याच्या अपेक्षेपेक्षा जरा जास्तच मोठं होतं ते. पार्सल घेवून तो मेन रिसेप्शनच्या दिशेने वळला. वाटेतल्या सेल्स मधल्या ब्लॉण्ड मुलीने एक तिरपा कटाक्ष टाकून त्याला स्माईल दिलं. त्यानेही अलगदपणे तिला कोम्प्लीमेंटरी लूक दिला. त्याच्या गालावरची खळी आठवून आज निदान ३-४ तास तरी तिला झोप येणार नाही म्हणजे... आपल्या सूटवरून हात फिरवत त्याने रिसेप्शन गाठलं. रूमचं स्वाईप कार्ड घेवून तो लिफ्टकडे निघाला. डावीकडच्या लाउंज मध्ये बसलेल्या जपानी डेलिगेश...

#दुनीयाने_हमको_दिया_क्या

Image
#दुनीयानेहमकोदियाक्या गावाच्या वेशीबाहेर कार थांबवून मी चौकशी केली. ' वरच्या अंगानं जावा. खाटकाच्या आळीला टांग मारून धनगरवाडी लागतीया. कुनालाबी इचारा. सत्तूला समदी पोरं वळकतात. ' फाटक्या कुर्त्यातून घाम ओघळून जाणाऱ्या एकाने सांगितलं. मी गाडी तिथेच सोडून चालू लागलो. बारकी बारकी पोरं घोळका जमवून गोट्या खेळात होती. तसाच पुढे विहिरीवर गेलो , पाण्याने अजून तळ गाठला नव्हता. घोटभर पाणी पिऊन खाटकाची वाडी धरली. जागोजागी बकरे सोलून अडकवलेले आणि कुंपणावर चामडं सुकत घातलेलं. श्वास रोखून तसाच तीरासारखा पुढे सुटलो. उतारावर   मेंढ्याच्या कळपात उभ्या हाडकुळ्या तरुणाला हटकलं ' तुमचा सत्तू कुठं राहतो रे ?'. त्यानं कपाळावरचा घाम उडवत विचारलं ' का काय झालं ?' ' अरे आधी घर दाखव. मग बाकीच्या चकाट्या पिट. सकाळपासून जीव काढलाय यानं. ' ' तालुक्यावरुन आला सा ?'  मी हो म्हणायची खोटी , तो बोंबलत धावत सुटला. ' आज्ज्या मैदान मारलं सत्तूनं... ' आणि मग माझी वरात त्याच्या मागे. सफारी सांभाळत सांभाळत मी कुडाच्या घरासमोर आलो. धापा टाकून झोपडीबाहेरच्या दगडावर ब...

#आज_फिर_जीने_की_तमन्ना_है (लघुकथा)

Image
# आज_फिर_जीने_की_तमन्ना_है तिने घडाळ्यात बघितलं तर ७.१० झाले होते. उबेर वाल्याने टॅक्सी टर्मिनसच्या बाजूने वळवली. एअर पोर्टवर उतरेस्तोवर ७.२० झाले होते. बिल पे करून ती ट्रावल ब्याग आणि पर्स सांभाळत मेन एन्ट्रन्सकडे वळली. आयडीकार्ड दाखवून ती लाउंजच्या दिशेने चालू लागली. वाटेवरच तिने ओनलाईन बोर्डिंग पासचा प्रिंटआउट घेतला. मग लाउंजवर जावून तिने कोपऱ्यातला सोफा हेरला. तिचा फेवरेट कॉर्नर – कॉफी शॉप च्या अगदी जवळ. ट्र्यावल ब्याग सोफ़्याजव ळ ठेवून तिने क्यापेचीनोची ऑर्डर दिली. दीड तास वेटिंग म्हणजे जाम बोरिंग काम. पण आज तिचा फेवरेट जेफ्री आर्चर तिच्या सोबत होता. अख्ख पुस्तक त्याच्या शोर्ट स्टोरीजनं भरून गेलेलं. कॉफीचे घोट घेत घेत ती वाचू लागली. “मे आय जोईन यु मिस?” तिने पुस्तकातून डोकं वर काढून बघितलं. एका फ्रेंच बिअर्डवाल्याने अगदी अदबीने तिला विचारलं.   “ओ शुअर. हु एम आय टू ओब्जेक्ट. बट यु मे नॉट बी एबल टू जोईन मी...” तिने पुस्तकाकडे बोट दाखवत म्हटलं. “ओ, जेफ्री आर्चर. नो सरप्राईज देन. बाय द वे, आय एम रिशी डी .” “अंजली.” तिने पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं. हल्ली असे भामटे...